Posts

Showing posts from August, 2025

मोक्ष सिरीज

 कुठलीही आई  मोक्षासाठी मुलांना तयार करत नाही  कारण शेवटी ती तिच्या कामातून जन्मलेली असतात  पण तुझ्या बापाच्या भविष्यकथनाने  माझ्या बाबतीत घातलेला घोळ  आणि माझ्या नावाने होणारी चमत्कारिक आध्यात्मिक आंघोळ  असं नाही की तू मला मोकाट सोडलं  पण असं ही नाही की तू मला बांधून ठेवलं  जगाच्या पाठीवर पोट लिहिलेलं असतं  जो पोट फाट्यावर मारायला शिकला  तो संन्यासी  मी कधीच भगवी वस्त्रे घातली नाहीत  संन्यास दाखवण्यासाठी  रंगाने अंग बदलले असते  तर लोकांनी कपडेच घातले नसते  आता तू नाहीयेस  पण तुझ्या आठवणींचा वावर  या घरात वावरतोय  गणपती घरात बसवला गेलाय  आणि मला माहित आहे  माझं शेवटचं विसर्जन  तुझा देह होता  श्रीधर तिळवे नाईक  (मोक्ष या सिरीजमधील मोक्ष: स्पंद या काव्यफायलीतून) संपूर्ण अंगभर शेकडो जखमा  विषाने स्वतःला बाहेर काढण्याचे शोधलेले विविध मार्ग  24 तास कळा  शून्याकडे किंचाळ्यांचे नियंत्रण  माझा फक्त कंठ निळा नाही  माझा देह निळकंठ झालाय यातना आणि दुःख ...
 ब्रिटिश कालीन भारत , क्षत्रिय आणि आत्ताचे काही प्रश्न श्रीधर तिळवे नाईक  भारतीय इतिहास लिहिताना आत्तापर्यंतच्या इतिहासकारांनी ज्या काही चुका केल्या त्यातील एक चूक म्हणजे ब्रिटिश काळाचा इतिहास लिहिताना फक्त ब्रिटिशांचा आणि त्यांच्या शासनाला विरोध करणाऱ्या स्वातंत्र्याची चळवळ करणाऱ्या लोकांचा इतिहास लिहिला वास्तविक यादरम्यान एक घटक होता जो या ब्रिटिश राजवटीचा पुरेपूर फायदा घेत होता लाभार्थी होता. हा घटक होता या देशातले ब्रिटिशांच्या आधीचे राज्यकर्ते जे ब्रिटिशांच्या तालावर ब्रिटिशांच्या काळात नाचत होते आणि त्यांच्या त्यांच्या प्रदेशात अंशिक प्रमाणात का होईना पण राज्य करत होते इतकेच नव्हे तर हे राज्य करताना ते पेन्शन सुद्धा घेत होते तनखा घेत होते किंवा काही रक्कम सुद्धा घेत होते. त्यांचा या साम्राज्यशाही शोषणामध्ये वाटा होता की नाही हा साधा प्रश्न सुद्धा आपल्याकडे विचारला जात नाही त्याचे कारण आपली सर्वांची या काळासंदर्भातली मनोवृत्ती ही दोन पद्धतीने डिझाईन झालेली आहे ब्रिटिशांनी आपल्या राज्यकारभाराकडे लक्ष जाऊ नये म्हणून क्षत्रियांच्या मार्फत होणाऱ्या राज्यकारभाराबाबतीतही फार क...
 मवाळ हिंदुत्व जहाल हिंदुत्व आणि गणपती उत्सव शैवाचार्य श्रीधर तिळवे नाईक  गणपती उत्सव आला की भारतामध्ये लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले यांच्या अंगाने चर्चा सुरू होते आणि गणपती उत्सव विशेषता सार्वजनिक गणपती उत्सव कोणी सुरू केला आणि गणपतीही पेशवे यांची कुलदेवता होती की नाही या अंगाने चर्चा आणि वादविवाद सुरू होतात  लोकमान्य टिळक यांचे विचार प्रणाली समजून घ्यायची असेल तर एक मूलभूत गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे ती म्हणजे भारतातल्या सर्व विचार प्रणाली ह्या कळत नकळत त्यांच्या आधी जन्मलेल्या राजकीय विचारप्रणालीला म्हणजेच धर्मांना फॉलो करत असतात म्हणजेच युरेशियन लोक आपोआपच वैदिक विचारप्रणाली, ब्राह्मणी विचार प्रणाली , वैष्णव विचार प्रणाली आणि हिंदू विचार प्रणाली अशा तऱ्हेनेच मांडणी करत राहतात म्हणजे काँग्रेसमध्ये तुम्ही जर पाहिलं तर सुरुवातीला राजा राम मोहन राय यांची वैदिक विचार प्रणाली उदयाला आलेली दिसते आणि काँग्रेसने नेहमीच भारतीय प्रबोधनाचा आद्य आरंभ राजा राम मोहन राय यांना मानले आहे काँग्रेसचा आरंभ ब्राह्मणांच्या हितसंबंधावरच आधारित होता म्हणजे ब्रिटिश सरकारमध्ये आणि राज्यांमध्...

नितीन वाघ गेला नितीन वाघ ची गोष्ट

 नितीन भरत वाघ पूर्वार्ध नितीन मला भेटला होता तो आल्हाद भावसार याची ओळख सांगत! आल्हाद भावसार हा माझा अत्यंत जवळचा दोस्त ! साहजिकच त्याला मी माझ्या आयुष्यात ताबडतोब ऍडमिशन दिले . तो आला ते मुळातच मी तुमच्या लिखाणाचा आणि कवितांचा फॅन आहे असे सांगत ! माझ्या जीवनाविषयी त्याने काही खऱ्या आणि काही खोट्या गोष्टी ऐकल्या होत्या . आणि तो त्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत असे गृहीत धरूनच बोलत होता साहजिकच मला काही गोष्टींच्या बाबत असं काहीही घडलेलं नाही असं सांगावं लागलं . न केलेल्या पराक्रमाविषयी श्रेय घेणे माझ्या तत्वात बसत नाही त्यामुळे साहजिकच मी ह्या गोष्टी केलेल्या नाहीत हे मला त्याला नाईलाजाने सांगावे लागले  नंतर मग मी भावसार ला फोन केला तर त्याने सांगितले की त्याने रेफरन्स दिलेलाच नाही आणि इथूनच हा कायमच परस्पर विरोध नितीन वाघबरोबरच्या माझ्या संबंधाबाबत वावरत राहिला  पहिल्याच भेटीमध्ये जाणवलेली पहिली गोष्ट म्हणजे त्याने त्याच्या पिढीतल्या लोकांच्या पेक्षा आमची पिढी अधिक काळजीपूर्वक वाचलेली होती दुसरी गोष्ट त्याची बुद्धी अतिशय तैलबुद्धी होती तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्या मनात जे य...

कदाचित आधीच टाईप केलेल्या कविता

सत्याभोवती अनेक असत्यांनी दुकाने थाटलेली असतात  पण सत्याला त्यामुळे काहीही फरक पडत नाही कारण सत्य शेवटी दुकानांच्या भाऊ गर्दीतही सत्यच राहतं  हळूहळू दुकानांचा बाजार बनतो  दुकाने मॉल होतात  सत्य दिसेनासे होते  पण तरीही सत्य सत्यच असते  वाळवंटातील एखाद्या अवचित वाढलेल्या वटवृक्षासारखे अचंबित करणारे  लोक म्हणतात वाळवंटात वड वाढत नाही  आणि सत्य तर वाळवंटातही उभे असते  मॉलमध्ये उभे असते ते प्रत्येक वस्तूमधून डोकावते  ते खरेदी करणाऱ्या हातात हलत राहते  ते पैशाच्या आवाजात झुळझुळते  ते कॅश क्रेडिटच्या अभ्यासक्रमात सळसळते  व्यवस्था सत्य वाचू देत नाही  सत्य वाचलं न गेलेल्या पुस्तकासारखे पडून असते  पण असते  सत्याचा ध्वनी कानावर आदळतच राहतो  हे जग बनवत राहतो  हळूहळू सत्य हे केवळ शाब्दिक सवय बनून जाते भाषेमध्ये  लोक केवळ सवयीने सत्याविषयी बोलत राहतात  सत्य सवय होते  सुटत तर नाही  पण उपयोगी नाही  आणि माणूस स्वतःही  जगण्याची सवय झालेले मशीन बनतो  शेवटी हे मशीन मरते  आणि सत...
 भविष्य पाहणारी माणसे श्रीधर तिळवे नाईक  कुठल्याही राष्ट्रांमध्ये किंवा राज्यामध्ये भविष्य पाहणाऱ्या लोकांची आवश्यकता असते हे ते लोक असतात जे समाजाला पुढे घेऊन जातात किंवा पुढे कसे जायचे ते सांगतात  माणसाच्या श्रद्धा युगात माणूस हा प्रामुख्याने अनुभवावर अवलंबून होता त्यामुळे साहजिकच ज्याचा जगाचा अनुभव जास्त आहे असा माणूस भविष्याच्या संदर्भात महत्त्वाचा होता अशा लोकांना भारतीय परंपरेत शहाणा वाईज असे म्हटले जाईल वैदिक परंपरेमध्ये अशा लोकांना ऋषी अशी संज्ञा आहे तर पाश्चात्त्य देशांमध्ये या लोकांना seer म्हणतात गरीब शोकांतिका मध्ये नेहमीच असा कोणी ना कोणीतरी seer असतो जो भविष्य पाहत असतो म्हणजे ईडीपस या नाटकामध्ये असा एक शहाणा मनुष्य दिसतो त्याच्याजवळ विजडम असते म्हणजे शहाणपण असतं आणि त्या शहाणपणाच्या जीवावर तो संपूर्ण टोळीला किंवा जानपदाला मार्गदर्शन करत असतो अनेकदा राजा ऐकत नाही आणि मग त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात  भगवान शंकरांच्या मुळे जेव्हा सर्वत्र मोक्षयुग अवतरले तेव्हा साहजिकच भविष्य पाहण्याची जबाबदारी मोक्षकावर आली आणि त्यांना दार्शनीक असा शब्द सुद्धा आला ...
 धनाढ्यता , श्रीमंती , प्रगती , विकास आणि भरभराट  श्रीधर तिळवे नाईक  माणसाच्या आदिम युगात संपत्तीची कल्पना तितकीशी प्रभावी नव्हती परंतु श्रद्धा युगात हळूहळू धन ह्या संकल्पनेने प्रवेश केला आणि ज्याच्याकडे धन आहे तो धनगर वा धनवान ही संकल्पना उदयाला आली हे धन प्रामुख्याने पशुधन होते आणि पशुपालन हाच या काळातला मुख्य व्यवसाय होता  पुढे शेतीचा उदय झाला आणि मोक्ष काळामध्ये पशुधना बरोबरच इतर धनांचाही उदय झाला मात्र हे धन प्रचंड नव्हते या धनाचा त्याग केल्याशिवाय मोक्ष मिळत नाही अशी संकल्पना हळूहळू द्यायला आले आणि त्यातूनच संन्यास नावाची संकल्पना जन्म पावली  यानंतर आलेल्या धर्मयुगामध्ये मात्र शेती केंद्रस्थानी आली आणि धर्म ही राजकीय विचारप्रणाली सर्वत्र उदयाला येऊन तिने या शेतीला धार्मिक स्वरूप द्यायला सुरुवात केली यातूनच एक धार्मिक व्यवस्था उदयाला आली आणि ही धार्मिक व्यवस्था सर्व गोष्टींचे नियंत्रण करायला लागली त्यातूनच पशुपालक धर्म जाऊन हळूहळू कृषीनिष्ठ धर्म उदयाला आले ज्यांच्या केंद्रस्थानी शेती हा व्यवसाय होता युरोपमध्ये ज्यू धर्म हा पशुपालननिष्ठ होता तो जाऊन रोमन कॅथ...
 स्वातंत्र्य आणि जीववाचवणी श्रीधर तिळवे नाईक  माणसाच्या जीवन चक्रात पहिले चक्र हे दोन गोष्टींशी संबंधित असते कामचक्र आणि जीववाचवणीचक्र ज्याला आपण वाचवणीचक्र म्हणू हे आदिम चक्र असल्याने ते तुमच्या लैंगिक अवयवांच्या सर्वाधिक जवळ असते यानंतर प्रत्यक्षात जेव्हा कृती करण्याचा प्रसंग येतो तेव्हा हे चक्र सर्वाधिक प्रथम काम करते या वाचवणी चक्रामध्ये भय अंगभूत असते त्यामुळेच भयापासून मुक्ती हा मोक्ष मिळवणाऱ्या माणसाला मुख्य अजेंडा म्हणून ठेवावा लागतो  माणसाला स्वातंत्र्य हवे असते मात्र स्वतःच्या जीवाची किंमत मोजून नाही आणि हितेच भयाचा प्रवेश होतो आणि माणसाला स्वातंत्र्याचेसुद्धा भय वाटायला लागते जर स्वातंत्र्यामुळे जीव जाणार असे तर मनुष्य अशा स्वातंत्र्याला कवटाळत नाही आणि इथूनच खरा गोंधळ सुरू होतो विचार कृती आणि आचार कृती करावीच लागते त्याशिवाय जगणे शक्य होत नाही पण त्यासाठी स्वातंत्र्य लागतेच लागते किमान पक्षी स्वतःच्या क्षेत्रामध्ये तरी कृती करण्याचे स्वातंत्र असावे ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे किंबहुना जिथे स्वातंत्र्य असते जिथेवर स्वातंत्र्य असते तिथे तिथे वर तुमचा एरिया...
 युरेशियन लोकांचे शत्रुत्व , बौद्ध धर्माची हकालपट्टी , जैन लोकांचे वर्णीकरण ,शैव-धर्माचे विस्थापन आणि त्यांचे कमबॅक  भारताचा विचारप्रणालीपूर्व म्हणजेच आयडियालॉजीच्या आधीचा इतिहास हा प्रामुख्याने धर्म ह्या राजकीय विचारसरणीने गजबजलेला आहे आणि धर्मच या काळामध्ये समाजाला अधिक सामाजिक आणि राजकीय आणि आर्थिक आकार देत होता असे दिसते  श्रमण संस्कृतीच्या उदया नंतर युरेशियन संस्कृतीच्या अंतर्गत संघर्ष जेव्हा सुरू झाला तेव्हा त्याचे काय करायचे हा ब्राह्मण धर्मापुढे फार मोठा पेच होता कारण जैन आणि बौद्ध हे युरेशियन धर्म असले तरी वर्णव्यवस्था स्वीकारायला तयार नव्हते इतकेच नव्हे तर या लोकांनी धर्माच्या परलोक (यामध्ये स्वर्ग आणि नरक असे दोन लोक येतात आणि जगातल्या जवळजवळ सर्वच धर्मामध्ये ते दिसतात )आणि कल्पलोक (यामध्ये चंद्रलोक ब्रह्मलोक सूर्यलोक असे अनेक लोक येतात अनेकदा हे फक्त भारतात जन्मलेल्या धर्मातच आढळतात )या दोन संकल्पना पूर्णपणे नाकारल्या होत्या आणि मनुष्य मरणानंतर फक्त पुनर्जन्म घेतो आणि तो इथेच घेतो अशी मांडणी केली होती म्हणजेच मनुष्याची यात्रा ही इहलोकांतून इहलोकांकडेच हो...