Posts

Showing posts from October, 2025

शैव श्रुती का आवश्यक आहे

पुन्हा एकदा श्रीधर तिळवे नाईक  आनंद मोरे यांनी प्रश्न विचारलेला आहे  शैव वैष्णव आणि धर्मनिरपेक्षतावाद याबद्दलच्या तुमच्या पोस्ट्स वाचताना नेहमी एक प्रश्न मनात येतो की धर्मनिरपेक्ष लोकांनी शैवधर्म स्वीकारावा असं तुमचं मत आहे. पण ज्याप्रमाणे वैष्णव आणि धर्मनिरपेक्ष लोक सत्ताकांक्षी आहेत त्याप्रमाणे शैव स्वतः सत्ताकांक्षी नाहीत का? आपण संपूर्ण भारतभर आपल्या शैवधर्माचा प्रसार करुन संपूर्ण भारत शिवमय करावा अशी आकांक्षा त्यांच्या मनात नाही का? आणि नसेल तर सत्ताविन्मुख होणाऱ्या गटाचा धर्म स्वीकारून धर्मनिरपेक्ष लोक सत्ताकांक्षी वैष्णवांचा मुकाबला कसा काय करु शकतील? सर्वात प्रथम तुम्ही एक जेन्यूइन प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल तुमचे अभिनंदन !  सर्वात पहिली गोष्ट जो खरा वैष्णव असतो तो राम कृष्ण हरीच्या मागे लागतो सत्तेच्या मागे लागत नाही जो शैव असतो तो शून्याच्या मागे लागतो 0 प्राप्तीच्या शून्य अवस्था प्राप्त करण्याच्या मागे लागतो सत्तेच्या मागे लागत नाही  तर आता एक टेंडन्सी म्हणून पाहू . सत्तेची आकांक्षा सर्वच माणसांच्यात असते त्यामुळे आपणाला असे म्हणता येत नाही की ती शैव लो...
मूळ मुद्दा भारतात जन्मलेल्या धर्मांना स्वतंत्र जागतिक ओळख असायला हवी की नाही श्रीधर तिळवे नाईक  हिंदुत्ववादाचा विचार करताना किंवा हिंदूवादाचा विचार करताना एकच गोष्ट अत्यंत स्पष्ट असायला हवी ती म्हणजे भारतात जन्मलेल्या धर्मांचे करायचे काय ? हा प्रश्न टाळूनच अनेक जण विशेषतः पुरोगामी लोक विचार करतात आणि त्यातूनच आत्ताचा सगळा पुरोगामीवादाचा घोळ झालेला आहे. मुळात मुद्दा वेगळा आहे. जगात सर्वच धर्म स्वतःचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यात यशस्वी झाले अशा प्रकारचे राष्ट्र किंवा अशा प्रकारचा राष्ट्रीय समूह निर्माण करण्यामध्ये भारतीय धर्मांना मात्र यश मिळालेले नाही याचे कारण अर्थातच ब्राह्मणी व्यवस्था आहे या ब्राह्मणी व्यवस्थेने भारताचे धर्माच्या आधारे राष्ट्र होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आणि पुन्हा असा काही विचार होणार नाही आणि प्रत्येक धर्म आपल्या कंट्रोलमध्येच राहील याची सातत्याने काळजी घेतलेली आहे प्रश्न असा आहे की ब्राह्मणी कारस्थानाला आता काही विरुद्ध उत्तर द्यायचे की नाही की नेहमीप्रमाणे मूग गिळून गप बसायचे?  पुरोगामी लोक असे सांगतात की तुम्ही मूग गिळून गप्प बसा तर हे मू...
इंद , हिंद ,मेलूहा समाज श्रीधर तिळवे नाईक  भारतामध्ये हिंदू आणि मेलुहा या शब्दाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे आणि मला पुन्हा एकदा इथे सांगायचे आहे की मूळ शब्द इंदू इंद हाच होता आणि त्यापासूनच नंतरच्या शब्दांची उत्पत्ती झालेली आहे भारतामध्ये शैव लोकांनी ज्या काही देणग्या दिल्या त्यामधली एक म्हणजे त्यांचे शैव कॅलेंडर भारतातले शैव कॅलेंडर हे नेहमीच पक्ष मानते आठवडा नाही सप्ताह नाही हे लक्षात घेतले पाहिजे 27 नक्षत्रांचा खेळ इथे चालतो आणि वार नसून तिथी महत्त्वाचे असते आणि ही तिथी चंद्राला धरून असते म्हणून त्याला इंदू म्हणजेच चंद्राचे कॅलेंडर म्हणतात हे कॅलेंडर पाळणारे जाणणारे लोक म्हणजे इंदू लोक होय आतूनच पुढे हिंद हा शब्द आलेला आहे आणि त्यानंतर शिवाजी महाराजांनी सतत वापरलेला हिंदवी हा शब्द आलेला आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे भारतीय समाजाला हिंदवी समाज म्हणा असे मी नेहमी सांगत असतो त्याचे कारण हिंदवी हा शब्द सुद्धा इंदू पासून आलेला आहे. ही चर्चा करताना १८९४ मध्ये नेपाळमधील सापडलेल्या रुम्मिनदेई स्तंभलेखाचा उल्लेख वारंवार केला जातो याचे कारण इतरत्र नसलेला पण इथे असलेला उल्लेख तो...
 आशुतोष दिवाण यांनी आपल्या वॉल वर एक पोस्ट टाकली आहे तिला मी दिलेले उत्तर श्रीधर तिळवे नाईक  आशुतोष दिवाण यांची मूळ पोस्ट  सरकारी नोकरीत यशस्वी पणे टिकण्यासाठी या पर्यावरणात जी आर्थिक आणि मानसिक लाचखोरी चालते तिच्यात किमान वेगळे (ॲाड)दिसणार नाही इतपत तरी सहभाग घ्यावाच लागतो.ही त्या त्या पातळीवरील किमान आणि अनिवार्य तडजोड आहे असे समजायला हवे आणि त्या व्यक्तीला दोष देता कामा नये. एक वेळ अशी येते की राजकीय हितसंबंध किंवा संबंधित पैश्यांची राशी इतकी मोठी होते की मग तिथे किमान आणि अनिवार्य तडजोड पुरत नाही.अशा वेळी अशा सरकारी अधिकाऱ्यांना व्यवस्थेतून बाहेर पडण्याचे सन्माननीय मार्ग उपलब्ध असले पाहिजेत. नाहीतर मग सर्वांगाने व्यवस्थेचा भाग होणे किंवा आता या मुलीने केली तशी आत्महत्या करणे भाग पडते. एकाच वेळी व्यवस्था आणि नैतिकता हे दोन भार सांभाळणे बय्राच सामान्य व्यक्तींना शक्य नसते. माझी कॉमेंट  शैक्षणिक भ्रष्टाचारापासून मुक्त राहण्यासाठी म्हणून बाहेरून काम करणाऱ्या लोकांना मी पाहिलेले आहे. पण होते काय मूळ शिक्षण व्यवस्थेतील करप्शन दूर असते का ? काही ठिकाणी मुलांना सर्रास कॉ...
 इंग्लंड जर्मनीमधील धार्मिक राष्ट्रवाद , भारतातले क्षत्रिय आणि हिंदुत्वाचा मूळ उगम श्रीधर तिळवे नाईक  अलीकडेच इंग्लंडचा राजा जो तिथल्या प्रोटेस्टंट इंग्लंड धार्मिक चर्चचा प्रमुखही आहे आणि सध्याचे व्हॅटिकन सिटी मधील कॅथोलिक धर्मप्रमुख पोप यांची गळा मिठी झाल्यामुळे अचानक पणे कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट यांच्यातल्या संबंधावर नव्याने चर्चा युरोपमध्ये सुरू झालेली आहे ही चर्चा होण्याचे कारण अर्थातच कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट हे दोन्ही ख्रिश्चन धर्म आता पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत का आणि तोडगा काढला जाणार असेल तर त्याचे स्वरूप काय असणार या अंगाने आहे. इस्लामच्या वाढत्या धोक्यामुळे हे घडले आहे का हा दुसरा प्रश्न आहे याचे कारण कळत नकळत आता सर्व ख्रिश्चन लोकांनी पुन्हा एकदा इस्लाम विरोधात उभे ठाकले पाहिजे अशी भावना संपूर्ण ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये उभी राहिली आहे. आपल्याकडे आपण आत्ताचे शंकराचार्य ज्यांचा प्रत्यक्ष शैव धर्माशी काडीचाही संबंध नाही लिंगायत धर्माशी, शीखधर्माशी , सत्यशोधक समाजाशी किंवा रामकृष्ण मिशनशी तोडगा काढायला एकत्र बसलेत असे इमॅजिन सुद्धा करू शकत नाही इतके आपले युरेशियन धर्मप...
 अण्णा हजारे आणि मोदी श्रीधर तिळवे नाईक  मी स्वतः अण्णा हजारेंचा पक्ष घेत असलो तरी त्यांच्या आंदोलनामुळे एक पॉझिटिव्ह स्पेस हिंदुत्ववादासाठी तयार झाली ही वस्तुस्थिती! हे असे अनेकदा होते म्हणजे ब्रिटिश आल्यानंतर भारतात हिंदू धर्म नावाची एक गोष्ट सेटल झाली आणि वैष्णव धर्म हिंदू धर्म म्हणून सेटल झाला भगवद्गीता हिंदू धर्माची धर्मग्रंथ झाली जर ब्रिटिश नसते तर हे झाले नसते. यातून पुढे मग कधी ना कधीतरी वर्ण जात वाद येणारच होतात तो आला कारण एकदा भगवद्गीता हाच धर्मग्रंथ असे तर भगवान कृष्ण यांनीच वर्णव्यवस्था तयार केलेली आहे आता एकदा भगवानांनीच वर्णव्यवस्था तयार केली म्हटल्यावर ती कशी काय मोडणार आणि तुटणार आणि ती मोडणार आणि तुटणार नसेल आणि ती जर का अशी दैवी असेल तर त्या संदर्भात पुरोगामी लोकांनी केलेली सगळी आंदोलने मातीत मिळणार हे ही नक्कीच असते आपल्या पुरोगामी लोकांना ही साखळी कळत नाही. त्यांना असे वाटते की वारकरी चळवळ हा फार इनोसंट चळवळीचा प्रकार आहे प्रत्यक्षात तो मुखवटा होता आणि खरा चेहरा वर्ण जाती व्यवस्था स्पॉन्सर करणारा वैष्णव धर्माचा होता. विसाव्या शतकातच वारकरी चळवळ प्रस्थापित ...
मानवजात पुन्हा पुन्हा युगाच्या शेवटच्या टोकावर सुसाईडकडे का जाते ? श्रीधर तिळवे नाईक  पुरोगामी वादामध्ये पुरोगामी महानवतेच्या शेवटी दोन आयडियालॉजीज आर्थिक पद्धतीने उदयाला आल्या. पहिली भांडवलवाद याची सुरुवात ऍडम स्मिथने केली होती आणि शेवटी तिचा शेवट साम्राज्यवादात झाला याउलट भांडवलशाहीला शह देण्यासाठी म्हणून समाजवाद आणि साम्यवाद आले यातील समाजवादाचा शेवट हा फॅसीझम आणि नाझीझममध्ये झाला तर साम्यवादाचा शेवट अत्यंत क्रूर असलेल्या स्टॅलिनवाद माओवाद व उत्तर कोरियन किम jong ऊनवादात झाला .  प्रश्न असा आहे की हे प्रत्येक युगाच्या अंतामध्ये असे घडते का? की असे झाल्यानंतर त्या युगाचा अंत होतो ?  कुठल्याही नवीन गोष्टीची सुरुवात झाली की ती सुरू करणाऱ्या लोकांना भयंकर त्रास दिला जातो कधी कधी मृत्युदंडाची सजा दिली जाते . पुरोगामी वाद याला अपवाद नाही त्यामुळेच ब्रुनोला जिवंत जाळले गेले बेकन गॅलिलिओला तुरुंगात पाठवण्यात आले आणि अशाच कित्येकांच्या आहुती दिल्या गेल्या. फ्रेंच राज्यक्रांती मधले अनेक क्रांतिकारक शेवटी गिलोटिन खाली गेले अमेरिकेला स्वतःचे स्वातंत्र्य युद्ध करून मिळवावे लागले....
 ब्राह्मणीकरण , वर्णगंड आणि मराठीतील वाचन संस्कृती श्रीधर तिळवे नाईक  भारतातील मौखिक संस्कृतीचा सर्वात मोठा दुष्परिणाम कुठला असा जर कोणी प्रश्न विचारला तर तिने पुरोगामी कालखंडामध्ये जगात सर्वत्र निर्माण झालेल्या वाचन संस्कृतीची केलेली हत्या हा परिणाम सांगता येतो. जगभरात एकंदरच इसवी सन 1000 वर्षापर्यंत वाचन संस्कृती फारशी नव्हती मात्र इसवी सन एक हजार च्या आसपास चीनने आणि कोरीयांनी प्रथम प्रिंटिंगचा म्हणजेच छापीलतेचा शोध लावला आणि ही छापील क्रांती हळूहळू युरोपमध्ये गेली तिथे मग गटेनबर्गने तिला एक आकार दिला  भारतातील शैव संस्कृती विषयी ती प्रामुख्याने मौखिक आहे हा सर्वात मोठा तिचा दोष आहे हे मी नेहमीच मांडत आलो आहे. आपल्याकडे या मौखिकतेचा पुरस्कार करणारे देशीवादी अतिशहाणे आजही आहेत प्राचीन काळातील मौखिकतेचा पुरस्कार मीही करतो पण हे करताना ती ताबडतोब छापील वा मुद्रित व्हावी म्हणून आग्रहही धरतो कारण दुसरा पर्याय नाही पण दुर्दैवाची गोष्ट अशी की प्रिंटिंग 19 व्या शतकात भारतात आल्यानंतर त्यामुळे जी वाचन संस्कृती तयार व्हायला हवी ती अजूनही तयार झाली नाही आणि याला जबाबदार या देश...
 बहुजन लोकांचा गेलेला आत्मविश्वास श्रीधर तिळवे नाईक  कुठल्याही समुदायाचा आत्मविश्वास घालवायचा असेल तर त्याचे श्रद्धांतर घडवून आणा एकदा का त्याच्या श्रद्धा हलल्या की आपोआपच सर्व आत्मविश्वास देणाऱ्या गोष्टी हालायला लागतात धर्म हा यासाठी जन्माला आलेला असतो ती एक राजकीय सत्ताप्रणाली असते जी संपूर्ण युग त्या युगातील सत्ता ताब्यात घेते . वास्तविक ब्रम्हांड किंवा निसर्ग आणि मनुष्य यांच्या मधले नाते हे एक अत्यंत स्वाभाविक नाते असते. मनुष्य सहजरित्या नैसर्गिक असतो आणि या नैसर्गिक नात्यासाठी त्याला कुठल्याही दलालाची गरज नसते. तो स्वतःच त्याच्या आसपासच्या पर्यावरणाशी पर्यावरणनिष्ठ असतो त्यातूनच त्याची प्रथम श्रद्धा प्रणाली आणि नंतर मोक्ष प्रणाली तयार होत जाते त्याचे स्वातंत्र्य अधिकाधिक वाढत जाते कारण तो आपल्या आसक्तींच्यावर हळूहळू यमनियम पाळत विजय मिळवायला लागतो याचा एक परिणाम असा होतो की जे मांत्रिक असतात त्यांचा धंदा धोक्यात येतो आणि या लोकांना स्वतःचा धंदा करायचा असेल तर हे नाते परवडणारे नसते साहजिकच मग माणसाचे निसर्गाशी असलेले नैसर्गिक नाते तोडून त्याला अस्तित्वात नसलेल्या परलोका...
 शैव लोकांची दृकश्राव्य काव्य परंपरा आणि त्याचे साईड इफेक्ट श्रीधर तिळवे नाईक  भारतीय शैव साहित्याच्या इतिहासामध्ये नेहमीच सर्व कलांना अनेकदा काव्य म्हटले जाते . सर्वसाधारणपणे या परंपरेला दृकश्राव्य परंपरा असे म्हटले जाते आणि काव्याचे दोन प्रकार केले जातात दृककाव्य आणि श्राव्य काव्य ! आजच्या भाषेत सांगायचे तर व्हिडिओ आणि ऑडिओ . पण यामुळेच एक गोची निर्माण झालेली आहे आणि ती म्हणजे कुठेही लिखित नाही . काव्य हे ऐकण्यासाठी असते ऐकवण्यासाठी असते या धारणेमुळे बहुतांशी काव्य हे मौखिक परंपरेने चालत आले तर जे दृककाव्य होते तेही मौखिक परंपरेनेच चालत आले . अपवाद फक्त चित्र आणि भित्तीचित्र शिल्प स्थापत्य! शैव मंदिरामध्ये सर्वसाधारणपणे आपणाला मोठ्या प्रमाणामध्ये चित्र भित्तिचित्र शिल्प स्थापत्य या गोष्टींचा प्रचंड मोठ्या प्रमाणात आविष्कार दिसतो चित्रकला मात्र बहुदा या काळातली नष्ट झालेली दिसते . कारण जे मटेरियल वापरलेले असावे ते टिकलेले दिसत नाही भवभूतीच्या मालती माधव या नाटकामध्ये चित्रे काढल्याचा उल्लेख आहे याचा अर्थ शैव परंपरेमध्ये चित्रे काढली जात होती विशेषत: बायका आपल्या प्रियकराची ...