Posts

Showing posts from June, 2025

मोक्ष आफ्टर इफेक्ट्स

 जन्मताना कितीही यातना झालेल्या असोत  बारसे थाटामाटाने झाले पाहिजे  लग्नात प्रेम असो नसो  वेडिंग सेरीमनी वाटले पाहिजे  मरण कसेही असो कोणाचेही  स्मशानयात्रा इव्हेंट वाटली पाहिजे  शेवटी  जो जन्मताना गाजला  लग्न करताना वाजला  आणि मरताना  ज्याचे फोटो व्हिडिओ इव्हेंटिंग झाले  त्याचे जगणे सार्थक झाले  नाचा  श्रीधर तिळवे नाईक  (मोक्ष या सिरीज मधील आफ्टर इफेक्ट या काव्यफायलीतून)
शैव इतिहासामध्ये आणि हिंदू परंपरेमध्ये कालिदास इतका महत्त्वाचा कसा काय ? श्रीधर तिळवे नाईक  Final शैव इतिहासामध्ये आणि हिंदू परंपरेमध्ये कालिदास इतका महत्त्वाचा कसा काय ? भाग एक श्रीधर तिळवे नाईक  युरेशियन लोकांनी सर्वाधिक हायजॅक केलेले जे काही शैव कवी आहेत त्यात कालिदासाचे नाव अग्रगण्य होईल तो इसवी सन पूर्व 150 ते 200 या कालखंडात जन्मलेला असावा त्याला गुप्त कालखंडात टाकण्याचा प्रयत्न युरेशियन लोक नेहमीच करत असतात परंतु हा प्रयत्न आता फसलेला आहे नवरत्नांच्यापैकी एक रत्न म्हणून दाखवणे हे सुद्धा त्यामुळेच येते पण "मालविका अग्नी मित्र " हे नाटक असे आहे की जे स्पष्टपणे तो अग्नी मित्राचा मित्र असावा असे सांगते हा शृंग कालखंडातला होता (बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतीक्रांती या संकल्पनेमुळे हा वंश वादळात सापडला असला तरी प्रत्यक्षात या वंशाने कधीही संस्कृतची पाठ राखण केलेली नाही त्यांचे सारे सारे शिलालेख हे प्राकृत भाषेत आहेत) आणि कालिदासाची बहुतांशी नाटके आणि कलाकृती प्राकृत आणि संस्कृत अशा दोन्ही भाषांनी बनलेल्या आहेत माझे स्वतःचे वैयक्तिक मत असे की मुलत: हा प्राकृतिक भाषेतच लिहीत हो...

उत्तरे

 आशुतोष दिवाण ह्यांनी माझ्या छोट्या लेखावर पुढील कॉमेंट दिलीये Ashutosh Diwan सर, आपल्याइतका अभ्यास व टेक्निकल जार्गन कळत नाही,पण लिखाणाचा जीस्ट समजून घ्यावा. आपण अस्तीत्ववादी/ॲबसर्ड अस्तीत्ववादी या कॅटॅगिरीत जी नावे घालता त्यातील सारंग,रेगे वगैरे ठीक आहे पण नगरकर यांच्याबद्दल काही समजत नाही.रेगे सारंगांचे साहित्य आपल्या जीवनाला सूक्ष्मपणे लागू आहे असे ॲार्गॅनिकली वाटत राहते,तसे नगरकरांचे,विशेषत: इंग्रजी लेखन वाटत नाही.इंटेलेक्च्यूअली ते तंत्र त्यांनी वापरले आहे व आपल्या कसल्याच स्पष्ट अस्पष्ट जिवनानुभवाला किंवा जीवनआकलनाला ते जुळत नाही असे वाटते. तसाच अनुभव मराठीत या दिशेचे कवि,”अरुण कोलटकरची कविता”नंतरचे कोलटकर आणि चंप्र आणि लाखे यांच्याबद्दल जास्त येतो.बळवंतबुवाच्या कविता काय,द्रोण काय हे तत्कालीन वाटत राहते.चंप्रंचे एकवेळ ठीक आहे पण आजचे मान्यताप्राप्त महत्वाचे कवी लाखे यांची ॲबसर्डीटी इतकी इनकोहेरंट असते की ती परपझलेस वाटते.अगदी वेटींग फाॅर गोदो सुद्धा माझ्या आयुष्याला लागू आहे हे मला कळते तसे या कविंचे होत नाही.वाचकाला कसलेच भान न देणारी चमत्क”कृती”चांगली महत्वाची कशी म्हणायच...

चॅनेल dnya : love live in love out

 प्रेम  प्रेम न्हवतं तुझं  आणि आय लव्ह यु म्हणत राहिलीस  आत असुरक्षिततेचे कोंब  आकांत आणि निष्ठुर बोंब  मी इमानदारीने कान देत राहिलो  माझा वास घेतलास  कि तुझं फूल व्हायचं नाही  फक्त येणारी उलटी तू दाबून ठेवतीयेस  असं वाटायचं  मग संशय घेतला कि तुझं आय लव यु  मी तुझी इमोशनल सपोर्ट सिस्टीम होतो का  आपत्कालीन आधारविमा  भेटीतल्या उत्कंठा  केवळ डोळ्यांच्या हालचाली होत्या का ? कि मी तुझी फक्त सवय होतो ? जीव तर पाळलेल्या कुत्र्यालाही लागतो  मी तुझा पाळलेला प्रियकर होतो का ?  प्रेम आणि मैत्री ह्यांच्या दरम्यान सख्य असते  मी तुझा सखा होतो का  कि मला कसं डिफाइन करायचं हे न कळल्याने  माझ्याबाबत काही डेफिनिटी ठरवता येत न्हवतं ? माझं प्रेम एकतर्फी  तू नेमकं कशासाठी दुतर्फा केलंस ? इमोशनल ट्राफिक ज्याम करण्यात  आपण दोघेही ज्याम वस्ताद आहोत  गाड्याच इतक्या पार्क करायच्या  कि रस्ता उरूच नये  मी पुरेसे एफर्टच टाकत नाही कशात बहुदा  मला काहीच अट्रॅक्ट करत नाही जगरहाठीमधलं  ...
दत्तात्रय संप्रदाय आणि शैव श्रीधर तिळवे नाईक  गेल्या दोन वर्षात भारतीय सांस्कृतिक इतिहासामध्ये जे काही महत्त्वाचे बदल घडले त्यातील एक म्हणजे शैव सर्व ठिकाणाहून हटवणे साहजिकच दत्तात्रयांच्या संदर्भातल्या सर्वशैव पोस्ट या हळूहळू गायब झालेल्या दिसतात विकिपीडिया मधला सुद्धा या यासंदर्भातला भाग आता गायब झालेला दिसतो हे करण्यामागचे उद्देश काय आहेत हे कळणे कठीण आहे पण एकंदरीत संपूर्ण संस्कृती ही युरेशियन झाली पाहिजे असा अट्टाहास आहे वास्तविक दत्त संप्रदायाचे सर्वात प्राचीन मंदिर हे 400 वर्षापूर्वीचे आहे त्याच्या आधीचे एकही मंदिर महाराष्ट्रात उपलब्ध नाही महाराष्ट्र बाहेर आणि कर्नाटका बाहेर दत्त संप्रदायाविषयी फारसा गवगवा नाही त्यामुळे अनेक प्रकारचा गोंधळ निर्माण झालेला आहे आणि हा गोंधळ वाढतच चाललेला आहे याबाबतीतला शैव इतिहास गहाळ झालाय आणि नवनाथ संप्रदाय कसा आपल्या तालावर नाचेल याची व्यवस्थित काळजी हल्ली घेतली जात आहे  मुळात नवनाथ संप्रदायाचा अर्थच हल्ली चुकीचा घेतला जातो. नवनाथ याचा अर्थ नवे नाथ नऊ नाथ न्हवे जैन प्रभाव जसा जसा वाढत गेला तसा तसा नाथ संप्रदायाचा प्रसार ओसरत गेला आणि त...

बाळबोध कविता

 माघार घ्यायला लागलेत  आजार आपोआप बरे व्हायला लागलेत  उशिरा का होईना सद्बुद्धी सुचली  जे कुलूप होते ते उघडणारे दार व्हायला लागलेत मुळात त्यांनी काट्यांची सक्ती आणायलाच नको होती  आता नामुष्की अशी की फुलांचे हार व्हायला लागलेत  हे असे होते विचार न करता केले की  आर पार लढाई होण्याआधीच पार व्हायला लागलेत  चला आपणही त्यांना माफ करूया  मूर्खांना अक्कल आली मूर्ख दिलदार व्हायला लागलेत  श्रीधर तिळवे नाईक  (बाळबोध कविता या काव्यफायलीतून) बापाचा उपदेश  प्रत्येक पोरगी कशाला पाहिजे  जी तुझ्यासाठी योग्य उशाला पाहिजे  वासना काय अफाट सुटणार  तिला इंद्रियांच्यात बांधायला पाहिजे  असूही आपण बहुपोरीवाले निसर्गावर कंट्रोल ठेवायला पाहिजे  मुलांमुळेच संसार जन्मतो  मुलांना नीट वाढवायला पाहिजे  चांगला असेल किंवा रटाळ  हा गाडा पुढे रेटायला पाहिजे  श्रीधर तिळवे नाईक  (बाळबोध कविता या काव्यफायलीतून) कोई फुल नही डरता कभी किसी आगसे  जानता है सुरज का भी वास्ता है बागसे  सांस हवा की उधार ली हुई रकम ...

डेकॅथलॉन वर्ड्स

 ये नजारा देखकर हर कोई परेशान हो गया वो जान बुझकर मुझे देख कर अंजान हो गया पता नही उसको इतना कॉन्फिडन्स कहा से था  मुझे जिंदा देख के मेरा कातिल हैरान हो गया अब लगता है कि वो कोई अपना गेम खेल रहा था  अजिब ये था कामयाबी के बाद वो पशेमान हो गया  कई बार सबके सामने उसने मेरी इज्जत निकाली  मैं मुस्कुराता रहा और मुस्कुराते हुए आसमान हो गया  अब उसे समझ मे नही आ रहा हैं मेरा क्या करे  वो काटता रहा फिर भी मैं उंचा इंसान हो गया श्रीधर तिळवे नाईक  (डेकॅथलॉन सिरीज मधील डेकॅथलॉन वर्ड्स या काव्यफायलीतून) नुसत्या कॉप्या मारण्यात सारी हयात गेली  जीवनसाप सळसळला नाही त्याची कात गेली  हे ते आहेत ज्यांना नाही ओरिजनलचा ध्यास  यांची नवी कॉपी जुन्या कॉपीला वहात गेली  सूर्यच आहे एक ज्याचा प्रकाश ओरिजनल  रात्र पृथ्वीची चंद्राला उशीखाली घेण्यात गेली  यांना गुलाबासारखे होता आले नाही कधीही  काटे आहेत म्हणून गुलाब नाकारण्यात गेली  आता फक्त एकमेकाला कॉपी पास करतात  ओरिजिनलचा सोस न उरला बधिरपणात गेली  माहित नाही कसे तू यांच्या...

चॅनेल लव लव्हर अँड टेररिझम

 तरसता रहा कहीसेभी बस उनका एक पल दीदार हो जाये  सामने आयी तो डर लगा कही उनसे ना प्यार हो जाये  वो खिंचके चली आयेगी तेरी तरफ तेरी अंधी उम्मीद हैं  ऐसा न हो तू सोचता रहे उसे किसी औरसे प्यार हो जाये  मैं आया हुं तुझे मेरी जिंदगीका हल समझकर  वो इश्क इश्कही क्या जिसमे इंसान बीमार हो जाये  उसके पास न अकाउंटेबीलिटी हैं ना कोई ओथेंटीसीटी  ये वो माहोल हैं श्रीधर जिसमे हर कोई बीमार हो जाये  कान तो हर किसिके पास हैं पहिले तुम मन कमाओ  सुनना सच आसांन नहीं कही सुनके तू ना खूँखार हो जाये  दिलका महल गिर गया बस पत्थर कुछ बचे हैं अंदर  जबतक मर्यादामे हैं ठीक हैं डर हैं न बेशुमार हो जाये  कुछ फोर व्हीलर्स छोड़ी हैं उन्होंने मेरे शहरके अंदर  सफर तो सारे ख़त्म हो गये धमाके ना कारोबार हो जाये  मजहब तो प्रॉस्पर हो रहे हैं अंजामं मगर पता नहीं हैं  थोडेसे बादल बचे हैं अभीभी कही वोभी ना दीवार हो जाये  कुछ दरख्त मर गये आज नुकसान हुआ वो जंगलका हुआ  इंसानका क्या ज़मीं खाली हुई कह रही हैं "नए बाज़ार हो जाये " सैतान आसमानसे टपकते न...

चॅनेल स्पिरीच्युअल

अनिश्चिततेला घाबरणारे लोक  पुन्हा पुन्हा परततात परंपरेत  पाठीला तोंड समजतात  आणि वाटचाल करतात  सूर्याकडे पाहून ओशाळतात  चंद्राच्या प्रकाशाला मूळ प्रकाश मानतात  पृथ्वीला सपाट समजतात  सपाट वाटचाल त्यांना आवडते  अनिश्चिततेला घाबरणारे लोक  देव निश्चित करतात  आणि त्याच्यात इतरांना फिट बसवतात  त्यासाठी अनफिट इतरांचे हात कापतात  पाय कापतात  आणि त्यांना स्वतःच्या सपाट पृथ्वीवर रांगायला लावतात  स्वतःच्या साईझमध्ये बसवतात  अनिश्चिततेला घाबरणारे लोक  अनुनभवी करुणेला टाचा घासायला लावतात  तिच्यावर आपली हृदये लादत  तिला गाढव बनवतात  त्यांच्याकडे लहानपणापासून जमवलेला तिकिटांचा सनातन संग्रह असतो  त्यांच्याकडे फसवणाऱ्या म्हाताऱ्यांची फौज असते  जी वाद्ये वाजवून मुलांना गुंगवण्यात एक्सपर्ट असते  अनिश्चिततेला घाबरणारे लोक  एकाच सुरवंटातून लाखो फुलपाखरे उडवून दाखवतात  प्रॉब्लेम इतकाच असतो  ही फुलपाखरे कशावरही बसू शकत नाही  ती उडून उडून मरून जातात  त्यांच्यावर घडयाळाच्या सावल...
 शैव श्रुती किंवा धर्म स्वतंत्र का आहे शैवाचार्य श्रीधर तिळवे नाईक कुठलीही श्रुती वा महाधर्म प्रामुख्याने 12 गोष्टींनी युक्त असते असतो  १ अनेक सहितांनी नटलेले शरीर असते उदाहरणार्थ काश्मीर शैवागममधल्या अभिनव गुप्ताच्या संहिता किंवा ज्ञाननाथांच्या अनुभवामृत किंवा चांगदेव पासष्टी  २ या संहितांना लोकांना समजावून सांगणारे आचार्य पुरोहित शैव धर्माबाबत आचार्य ,पंडित ,पुजारी व गुरव यांचे सातत्य व उपस्थिती स्पष्टपणे दिसते  ३ केवळ त्या सातत्यातच उपस्थित असणारी  भूतकालिनता जिच्यात परंपरा इतिहास सातत्य वारसा आणि जनुकता टिकून असते तेही स्पष्टपणे दिसते  ४ अशी उपस्थिती जी नेहमीच इतर उपस्थितीच्या पेक्षा आपण कसे वेगळे आहोत हेही सांगत असते यासंदर्भात सतत तुलना करत असते  ५ तस्सम आणि तद्भव संस्थाशी स्पर्धा याबाबतीत शैव आणि वैष्णव धर्म यांनी संस्थात्मक प्रचंड स्पर्धा केली असे दिसते दक्षिणेत्तर शैव धर्माची मुख्य स्पर्धा ही जैन आणि बौद्धांशी झालेली आहे आणि वादही झालेले आहेत ६ त्या धर्माच्या संस्थापकावर विश्वास असतो भारतात शैव धर्म हा नेहमीच भगवान शंकरांनी स्थापन केला आणि...
तामिळ नाडू  मधील पंच समाज आणि शैव  मी हे पूर्वी सांगितलेले आहे कि शैव लोकांच्यात वर्ण जाती न्हवत्या पण समाज होते हे समाज पुढील प्रमाणे  १ तमिळ कम मध्ये समाजाला मक्कल म्हणत तिथे मरूत मक्कल हे शेती करणारे होते मूळ हनुमान हा या समाजातून आलेला होता  २  कुर्रवन मक्कल हे जंगलात राहायचे मी नेहमी सांगितलेले आहे की शंकराच्या स्कंदाचे  दक्षिणेकडे अधिपत्य होते आणि शंकर-पार्वतीने त्यालाच दक्षिण ही दिशा दिली होती त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रात जसा खंडोबा तसा या समाजात मुरुगन हा शिवपुत्र यांचा देव होता  ३ मुल्लई मक्कल म्हणजे पशुपालक ह्यात प्रामुख्याने धनगर सणगर गवळी समाज होते  ४ न्येतेल मक्कल म्हणजे कोळी विशेषता समुद्राच्या काठी किंवा नदीच्या काठी व मासेमारी किंवा मीठ तयार करणारे समाज होते मराठी भाषेत ह्यांना कोळी आणि आगरी म्हणतात  ५ पलई मक्कल पर्वतावर राहणारे पहाडी लोक  असे पाच समाज दिसतात पुरोहित समाज स्वतंत्र समाज म्हणून अस्तित्वात नाही हे लक्षात घेण्याजोगे आहे  रामायणामध्ये नेमक्या मरुत लोकांनी रामाचे का स्वागत केले असे का चित्रण केले गेले अ...
 माझ्याशेजारी पडलेल्या कवीचे स्वगत विभाग १३ श्रीधर तिळवे नाईक १ देव माणसांप्रमाणे दिसतात हे कॅरलला आलं कि तीव्रतेनं जाणवतं माझे वडील जे बबलइतके हलके होते गोळाफेकीतल्या गोळ्यासारखे जड होत गेले वजन नेमकं कुठं वाढलं ते शेवटपर्यंत कळलं नाही इथल्या देवांचंही काहीसं तसंच झालेलं दिसतंय देव माणसांपेक्षा वजनानं हलका पाहीजे तरच माणूस तरतो नाहीतर देवात बुडून मरतो २ हे लोक आमच्यासारखेच दिसतात पण ह्यांचे देव आमच्या देवांपेक्षा क्रूर आहेत अँडीजच्या पायाशी सुख शिखरावर नरभक्षक दुःख ग्रहणांना सतत घाबरणारे लोक सूर्याला अंडरएस्टीमेट करत असतात परदेशात स्वदेश सुट्टीवर गेलेला असतो इथं तसं होत नाहीये कदाचित हे लोक समुद्रात वाट चुकलेल्या आमच्याच पूर्वजांचे वारस असावेत ३ मेलेल्या पूर्वजांच्यात अडकून पडण्याची सवय सगळीकडं बरं झालं भगवान शंकरांनी पुनर्जन्म सांगितला निदान आमच्यासारखे काही पूर्वज पुन्हा जन्म घेऊन सेटल झालेत म्हणून कायमचे त्यांच्यापासून मुक्त झालो ४ इथले भगत नशा करून प्राणी बनतात आणि अंगात आल्यासारखे बोलतात मी इथं पॅरॅक्स डिशेससाठी आलोय एका श्रीमंतांनं ऑफर दिलीये मी अँटिक गोष्टींना कमर्शियल करून...

विषघटनाच्या कविता

 सैतान चालून येतो तेव्हा एका भावाला केलेला उपदेश श्रीधर तिळवे नाईक  १ रक्त पिळून त्याची कपडे वाळत घालणारी दोर बनवणारे लोक  शेकींग करणाऱ्या हातांना शॉक देणारे लोक  नपुंसकतेला ब्लेडच्या तालावर नाचायला लावणारे लोक  बाहुल्यांना मीठात भिजवून ठेवणारे लोक  तुझ्या सभोवताली  मला माहीत नाही तू कसा लढणार आहेस ? एकेकाळी मी अहिंसेने लढलो होतो  आणि शेवटी स्वतःच बांधलेलं घर सोडून  म्हाडात रवाना झालो होतो  तुझ्यात ही क्षमता आहे ? २ भन्ते त्यांनी तुझे हात कापून तुझ्या हातात दिले तर तू काय करशील  मी त्यांनी माझे पाय शाबूत ठेवले म्हणून धन्यवाद देईन  भन्ते त्यांनी तुझे पाय कापून घेतले तर तू काय करशील  मी त्यांनी माझे डोळे शाबूत ठेवले म्हणून धन्यवाद देईन  भन्ते त्यांनी तुझे डोळे काढून घेतले तर तू काय करशील ? मी माझी चालण्याची गती स्वच्छ करतोय  माझी धन्यवाद बोलणारी जीभही कापली जाऊ शकते  हे मी जाणतो  ३ आणि भूषण फोनवरून सांगतोय  दादा , आठजण आहेत  आणि आ उभाय एकट्याने त्यांच्यासमोर  तू काय करतोयस  मला लपायला...