राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय श्रीधर तिळवे नाईक तुमको जगाच्या संदर्भामध्ये तुम्ही काहीही केले तरी तुम्हाला प्रशासनीय कारणासाठी त्याची युनिट्स करावीच लागणार त्यामुळे राष्ट्रवाद ना करणारे लोक प्रॅक्टिकल नसतात अगदी यामध्ये जे कृष्णमूर्ती यांच्यासारखे लोक सुद्धा येतात मोक्षाच्या पातळीवर राष्ट्र असत नाही पण अर्थ या पातळीवर राष्ट्र अस्तित्वात तर आहेच पण प्रत्यक्ष प्रॅक्टिकल लेवल ला व्यवहारिक पातळीवर ते स्वीकारावे लागते संसाराच्या संदर्भाशी निगडित असलेल्या सर्व वस्तूंचे अध्ययन अर्थविद्येत होते मितीके म्हणजे मितीनी बद्ध झालेले शक्तीचे आकार ! ती आपणाला कधीच संपूर्ण दिसत नाहीत आपणाला दिसतात ती आपल्या तथ्याशी जोडले गेलेले आकार ! त्यांना आपण वस्तू म्हणतो या वस्तूंचे प्रामुख्याने खालील प्रकार असतात १ निसर्गवस्तू झाड मनुष्य प्राणी वगैरे २ प्रति निसर्ग वस्तु माणसाने निसर्गातल्याच वस्तूंना आकार देऊन बनवलेल्या वस्तू उदाहरणार्थ चामड्याची पिशवी ३ पवित्र वस्तू धर्माने पवित्र म्हणून घोषित केलेल्या वस्तू ४ क्रयवस्तू माणसाने निसर्ग वापरून निर्माण केलेल्या मानवी वस्तू ज्या ...
Posts
Showing posts from September, 2025
- Get link
- X
- Other Apps
अनुभवविटाळ संस्कृती आणि भारत पाकिस्तान क्रिकेट श्रीधर तिळवे नाईक खरे तर हा विषय इतक्यांदा चघळून झालाय पण तरीसुद्धा तो जिवंत होतच असतो आशिया कपच्या निमित्ताने तो पुन्हा जिवंत झाला . अनुभवसंस्कृती ही कुठल्याही संस्कृतीची बेसिक सांस्कृतिक पाया असते .माणसाचे आयुष्य हे नेहमीच प्रत्यक्ष ,परोक्ष आणि अपरोक्ष अनुभवाच्या आधारे चालत असते पण माणूस फक्त इथेच थांबत नाही .तो अनुभव निर्माण करणे शिकतो किंबहुना माणसाची पहिली तंत्र ओळख ही अनुभव निर्माण करण्यापासून अनुभवाचे तंत्र निर्माण करण्यापासून सुरू होते . नाट्य वेद हा शंकरांनी दिला त्याचे सर्वात मोठे कारण हे तंत्र सर्वात मोठे आहे याची त्यांना कल्पना होती .अर्थातच हे तंत्र प्रामुख्याने चित्र आणि भाषा आहे पुढे मग माणसाचा विस्तार होत गेला तशी माणसाने स्वतःची चिन्ह संस्कृती आणि नंतर माणसाने संपूर्ण चिन्हसृष्टी विकसित केली आणि आज अवस्था अशी आहे की चिन्ह प्रत्यक्ष , चिन्ह परोक्ष आणि चिन्हअपरोक्ष असे तिन्ही प्रकारचे अनुभव माणूस सहजरीत्या निर्माण करत आहे. मी आशा अनुभवांना प्रति अनुभव म्हणतो . भारतात सर्वात मोठा विकला जाणारा प्रति अनुभव म्हणजे क...
- Get link
- X
- Other Apps
काम कर्म व्यवहार आणि मोक्ष मुकुंद टाकसाळे यांनी प्रश्न विचाराला आहे तो प्रश्न पुढीलप्रमाणे कोणालाही अखेरपर्यंत जिवंत असेपर्यंत कर्म सोडत नाही. कर्म हे आचरण आहे. तोच धर्म. धर्म कर्म स्वतंत्र नसते. ते आत्तापर्यंतच्या अनेक वाटांवरच नेहमी आधारित राहते. मोक्षानंतर वा समाधी नंतरही कर्म सुटतं कां मोक्ष ही संकल्पना वा स्थिती कर्मनिरासित असते कां . त्यापर्यंत जाणेचे त्याग टप्पे किती कसे.? श्रीधर तिळवे नाईक म्हणजेच मी दिलेले उत्तर उत्तर: सर्वात प्रथम क्रिया आणि कर्म यांच्यातला फरक लक्षात घेतला पाहिजे क्रियेमध्ये मध्ये मी असत नाही कर्मामध्ये मी असतो म्हणूनच ज्यांचा पिंड क्रियापिंड आहे अशा लोकांनी अशा लोकांनी क्रियातंत्राच्या मार्गाने मोक्ष मिळवावा प्रश्न नेहमी हाच असतो की पिंड ओळखणे शिवलिंगामध्ये एक प्रकार पिंड लिंगाचा आहे त्यामध्ये स्वतःचा पिंड ओळखण्यासाठी त्या पिंडासमोर बसून संपूर्ण लक्ष पिंडीवर केंद्रित केले जाते आणि हळूहळू मग स्वतःच्या आत काय घडत जाते ते पाहिले जाते आज जे जे काही घडते त्याचे निरीक्षण आणि परीक्षण करून मग आपला पिंड काय आहे ते ओळखले जाते . सर्वसाधार...
- Get link
- X
- Other Apps
अवधूत परळकर यांना दिलेले उत्तर ते म्हणतात Shridhar Tilve ज्यांना प्रश्न कळतात त्यांना नाहीच सापडत सोल्युशन. ज्यांच्यापाशी सोल्यूशन आहे त्यांना ते कोणत्या प्रश्नाचे सोल्युशन आहे कळत नाही. जी ए कुलकर्णी स्टाईल उत्तर. माझे उत्तर Awdhoot Parelkar सर माझ्यापुरते एक सोल्युशन आहे ते म्हणजे धर्म नाकारायचा आणि मोक्ष स्वीकारायचा निर्वाण स्वीकारायचे कैवल्य स्वीकारायचे प्रत्येक देशाची स्वतःची म्हणून एक धारा असते किंबहुना परंपरा आणि धारा यांच्यामध्ये फरक हाच असतो परंपरा जुन्याकडे घेऊन जाते तर धारा काही नवी सोल्युशन सुचवण्या इतपत मोकळी असते मोक्ष ही या देशातील कायमच एवर ग्रीन गोष्ट आहे आणि नवे नवे मोक्षक (सिद्ध आणि बुद्ध) ती अधिकाधिक नवीन करत असतात त्यामुळे ठामपणे उभे राहणारा धर्म आणि सतत कात टाकणारी मोक्ष धारा यांच्यात कायमच संघर्ष होत राहतो आणि प्रत्येक सिद्ध आणि बुद्ध हा संघर्ष आपल्या पद्धतीने लढत असतात तेव्हा धर्माविरोधात जर का समाजवादाने मोक्ष स्वीकारला असता तर ही लढाई खूप व्यवस्थित झाली असती मी समाजवादाकडून आंबेडकरवादाकडे गेलो याचे कारण हेच होते आंबेडकरांनी निर्वाण संकल्पना स्वीकारली हो...
- Get link
- X
- Other Apps
अस्ताचं युग आणि नवनिर्माणाचे प्रयत्न श्रीधर तिळवे नाईक मी नागेशी बांदिवड्याचा आहे किंवा कोल्हापूरचा आहे म्हणजे काय आहे ह्या प्रश्नाने माझा न्यू कॉलेज मध्ये प्रवेश घेतल्यापासून सतत पाठलाग केला आहे १९८० ते १९८७ हा माझा कालखंड मोक्ष आणि त्यासाठी स्वतःचे संस्कारण म्हणजे कंडिशनिंग तपासणारा आणि तासणारा कालखंड आहे माझ्या मिलिंद गुर्जर , जयसिंग पाटील , बाळकृष्ण शिर्के , महेश पुसाळकर , विश्वजित जाधव , अजय कोंडेकर , शरावती यादव , श्रीराम पचिंद्रे , राजकुमार यादव , निनाद काळे , विलास कांबळे , शेखर जाधव , काशिनाथ मंगल , श्रीनिवास एकसंबेकर , अवधूत भट , विजय पवार अशा अनेक कलावंत वा कलासक्त मित्रांना त्याकाळात कोल्हापूरने भारावून टाकले होते आणि जवळपास दिवसातून एकदा महाद्वार रोडला किंवा रंकाळ्याला गेल्याशिवाय दिवस सफल झालाय असं आम्हाला वाटत न्हवते एक अस्तंगत चाललेले कोल्हापूर शेवटचे नागरिक म्हणून जणूकाही आम्ही आमच्या डोळ्यात साठवून घेत होतो हे कोल्हापूर शाहू महाराजांच्या प्रबोधनाचं , गोविंद पानसरेंच्या मार्क्सवादाचं , शैवांच्या अंबाबाईचं , आली रे आली गाडी आली म्हणत गर्जणाऱ्या श्रमिकांच्य...
- Get link
- X
- Other Apps
युरेशियन परंपरेमध्ये एकच वेद असताना त्याचे चार वेद कसे आणि का बनले श्रीधर तिळवे नाईक मला स्वतःला ऋग्वेद का प्रिय आहेत हे सर्वात प्रथम पुन्हा एकदा मी सांगतो माझ्या मते भारतामधील श्रद्धांचे स्वरूप काय होते हे जर कळायचे असेल तर ऋग्वेदासारखे माध्यम नाही इतक्या तपशीलवार आपणाला श्रद्धेची माहिती इतरत्र क्वचितच मिळते इथे आपणाला एका श्रद्धेतील दैवतरूप मिळते त्या दैवतांच्या केल्या जाणाऱ्या प्रार्थना मिळतात आणि या प्रार्थनांच्यातून टोळ्यांची श्रद्धा नेमकी काय होती आणि त्यांच्या भोवताली त्यांच्या पर्यावरणामध्ये नेमके काय काय होते ते स्पष्ट होते खरे तर युरेशियन परंपरेमधील टाईम लाईन ही जास्त स्पष्ट आहे म्हणजे वेदातील भूगोल जे भारतीय आणि अभारतीय असे दोन्ही आहेत उपनिषदांच्या मधील भूगोल जे स्पष्ट आणि स्वच्छपणाने भारतातच लिहिले गेले आणि नंतर ब्राह्मण ग्रंथांच्या मधून आलेले भूगोल यांची एक टाईम लाईन तयार करून आपणाला उत्तर भारतातील भूगोलाचा इतिहास लिहिता येतो मला ऋग्वेद प्रिय आहेत ते त्यामुळे ! त्यांच्याकडे मी धार्मिक डॉक्युमेंट म्हणून कमी आणि ऐतिहासिक डॉक्युमेंट म्हणून अधिक पाहतो कारण जगातील इतर क...
- Get link
- X
- Other Apps
दशावतार प्रभावी अभिनय आणि मेसेजचा चित्रपट श्रीधर तिळवे नाईक कुठलाही वाद हा प्रथम कवितेत मग कथा कादंबरी व नंतर नाटकात आला की तो सर्वात शेवटी चित्रपटात पोहोचतो आणि नंतर टेलिव्हिजनमध्ये आणि कदाचित चित्रपटाच्या बरोबरीने वेब सिरीज मध्ये ! देशी वाद किंवा उत्तर आधुनिक वाद याला अपवाद नाहीत ते चित्रपटाच्या क्षेत्रामध्ये हॉलिवूडमध्ये 70 पासून आणि बॉलीवूडमध्ये 2000 पासून पोहोचायला सुरुवात झाली उत्तर आधुनिक चित्रपटातील हिंसा ही अत्यंत रानटी स्वरूपाची असते ती तशी का असते हा एक प्रश्न असावा परंतु कळत नकळत माणसातला पशु दाखवणे हा त्याचा उद्देश असतो याला दशावतार फार अपवाद नाही परंतु तरी देखील मराठी प्रेक्षकांना इतका रानटीपणा झेपणार नाही हे लक्षात ठेवून हिंसा थोडीशी सौम्य केलेली आहे मात्र वराह किंवा नरसिंह अवतारा सारखे अवतार दशावतारातील मास्क पद्धतीने वापरत ही हिंसा भडक केलेली आहे . अर्थातच कन्नड चित्रपटांमध्ये उदाहरणार्थ कांतारा ज्याचा या चित्रपटावर प्रभाव आहे भडक हिंसेचे भडक चित्रण अधिक प्रभावी पणाने आलेले आहे कारण तिथे संहिता आणि दिग्दर्शन अधिक प्रभावी आहे दिलीप प्रभावळकर यांच्या अभ...
- Get link
- X
- Other Apps
पुन्हा एकदा दशशक्ती दशहरा: शैवाचार्य श्रीधर तिळवे नाईक संस्कृत मधून काहीही आलं की ते फार प्रमाण असतं असा काहीतरी गैरसमज आपल्याकडे संस्कृतला प्रमाण मानल्याने झालेलां आहे मुळात बहुजन समाजाला शब्दप्रामाण्य स्वीकारायला लावणे ही ब्राह्मण्य आणु पाहणाऱ्या मानणाऱ्या लोकांची सर्वात मोठी ताकद असते. त्यातूनच मग अलीकडे वैष्णव लोक शैव धर्मामध्ये प्रचंड हस्तक्षेप करताना दिसतात .खालील फिरणारा मेसेज हा त्याचा आणखी एक पुरावा प्रथमं शैलपुत्रीति द्वितीयं ब्रह्मचारिणी । तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकम् ॥ पञ्चमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनी तथा । सप्तमं कालरात्रिश्च महागौरीति चाष्टमम् ॥ नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः । उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना ॥ 🙏 हैप्पी नवरात्रि वास्तविक नवरात्र हा दशरात्र आहे हे मी खूपदा सांगितले आहे आणि दशहरा म्हणजे पार्वतीच्या मोक्षाचा उत्सव होय हेही खूपदा सांगून झालेले आहे शैव लोकांचे हे मोक्ष उत्सव कसे मोक्षापासून तोडण्यात आले हा एक फार मोठा इतिहास आहे वरील संस्कृत रचना म्हणजे त्या दिशेने झालेला आणखी एक प्रयत्न ! मुळात ज्या दश...
- Get link
- X
- Other Apps
हिंदू धर्माला संस्थापक का नाही? श्रीधर तिळवे नाईक अलीकडे रजनीकांत यांनी हिंदू धर्माची विशेषता सांगताना हिंदू धर्माला संस्थापक नाही हा पब्लिक दृष्टिकोन पुन्हा एकदा प्लॅटफॉर्मवरून मांडला अर्थातच ते काही धर्म नेते नव्हेत पण आपणाला मात्र असे का आहे हा प्रश्न विचारायला हवा वस्तुस्थिती अशी आहे की शैव, जैन आणि बौद्ध या तिन्ही धर्मांना संस्थापक आहेत यातील शैवधर्म हा शंभू शंकर यांनी स्थापन केला तर जैन धर्म हा भगवान महावीर यांनी स्थापन केला बौद्ध धर्म हा स्पष्ट आणि स्वच्छपणे गौतम बुद्ध यांनी स्थापन केला. या तिन्ही धर्मांना संस्थापक आहेत मग संस्थापक कुठल्या धर्मांना नाही हा प्रश्न आता आपण विचारायला पाहिजे आणि मग आपल्यावर नेमके काय लादले जाते हे आपल्याला कळू शकते. वस्तुस्थिती अशी आहे की युरेशियन धर्मांना संस्थापक नाहीत कारण हे सर्व धर्म मोक्ष मिळवलेल्या लोकांनी स्थापन केलेले नाहीत तर ते भगत समूहाने स्थापन केलेले धर्म आहेत आणि या भगतांना ब्राह्मण म्हणतात. ते श्रद्धां- आधारित धर्म आहेत . यातील पहिला वैदिक धर्म हा सुरुवातीला धर्म नव्हता हे आपण लक्षात घेतले पाहिजे तो मुळात...
- Get link
- X
- Other Apps
आद्य शंकराचार्यांचा अस्त श्रीधर तिळवे नाईक भारताच्या धार्मिक इतिहासामध्ये सर्वात वादग्रस्त व्यक्तिमत्व कोणते असा जर प्रश्न विचारला तर नक्कीच काही लोक आद्य शंकराचार्यांचे नाव घेतील कारण त्यांनी काय केले त्यांचा कालखंड कोणता याविषयी प्रचंड वाद आहेत त्यातच शैव-धर्मातले आचार्य शंकर आणि हिंदू धर्मातले आद्य शंकराचार्य या एकच व्यक्ती होत्या की त्या दोन व्यक्ती होत्या याविषयी प्रचंड मोठे मतभेद आहेत अनेकदा युरेशियन परंपरा शैव लोकांना आणि बौद्ध लोकांना आपल्यामध्ये सामावून घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात घाल घुसळ करत असते तिचा नेमका अदमासच येत नाही त्यामुळेच इतिहासात नेमके काय घडले हे अंधुक होत जाते आचार्य शंकरांचा काळ हा गौतम बुद्धानंतरचा काळ आहे हे नक्की आहे तो साधारणपणे इसवी सन पूर्व तिसरे शतक असावा त्या उलट आद्य शंकराचार्यांचा कार्यकाळ हा सातवे ते नववे शतक यादरम्यान सांगितला जातो ही व्यक्तिरेखा होऊन गेली असं ठामपणे सांगितले जाते मात्र कधीकाळी ती खरोखरच होऊन गेली का असे प्रश्न निर्माण करण्यात आले होते मुळातच आचार्य शंकर यांचे काय करायचे हा एक फार मोठा प्रश्न आहे मात्र आद्य शंकराचार...
- Get link
- X
- Other Apps
अक्ष , अपरोक्ष आणि चिन्हकी श्रीधर तिळवे नाईक मराठी भाषेमध्ये जे काही शब्द पूर्णपणे distorte झाले त्यामध्ये कदाचित अपरोक्ष या शब्दाचा प्रथम क्रमांक लागावा मराठी ही अशी एकमेव संस्कृती आहे जिथे शैव धर्मी शब्द अजूनही वापरत असतात म्हणजे ध्यानासाठी असलेला छान हा शैव शब्द फक्त मराठी भाषेतच तुम्हाला उपलब्ध दिसेल आणि अलीकडे तो चायना मध्ये गेल्याने चायना मध्ये ध्यानाला छानच म्हणतात . अपरोक्ष या शब्दाचे सुद्धा असेच झालेले आहे मात्र त्याचा नेमका अर्थ आता मराठी लोक विसरून गेलेत कारण मराठी लोक हल्ली विठ्ठलवादी झालेले आहेत मराठीमध्ये आपण सर्रास "त्याच्या अपरोक्ष आपण हे काम केले ''असे म्हटले जाते म्हणजेच तो नसताना त्याच्या अनुपस्थितीत अशा प्रकारचा अर्थ अपरोक्ष या शब्दाला प्राप्त झालेला आहे प्रत्यक्षामध्ये त्याचा अर्थ परोक्ष नाही ते अपरोक्ष म्हणजेच परोक्षाच्या अनुपस्थितीत जे परोक्षाला सादर करत असते ते अपरोक्ष होय म्हणजेच एका अर्थाने प्रत्यक्षाच्या अनुपस्थितीत जे जीवामध्ये घडते ते परोक्ष आणि परोक्षाच्या अनुपस्थितीत जे जीवांच्या पुढे घडत असते सादर होत असते ते अपरोक्ष होय . हे सर...
- Get link
- X
- Other Apps
अक्ष आणि प्रत्यक्ष श्रीधर तिळवे नाईक शैवधर्मी लोकांच्यात अक्ष ही संकल्पना फार महत्त्वाची मानली जाते अक्ष म्हणजे डोळा असा अर्थ असला तरी तो अलीकडचा अर्थ आहे असे अनेकांना वाटते प्रत्यक्षात तो फार प्राचीन आहे पहिला डोळा दुसरा डोळा आणि तिसरा डोळा यातील तिसरा डोळा ही संकल्पना भारतात भगवान शंकरांच्या मुळे खूपच लोकप्रिय झाली त्याचा संबंध थेट मोक्षाशी आहे किंबहुना मोक्ष हाच तिसरा अक्ष तिसरा डोळा होय तो ज्याचा उघडला तोच सत्य होऊन जातो सत्य शोधले जात नाही सत्य होता तुम्ही सत्य होता म्हणजे जो निरीक्षक आहे तो सत्य होतो जेव्हा तुम्ही सत्य होता तेव्हा तुम्ही नाहीसे झालेले असता म्हणजेच निरीक्षकच नाहीसा झालेला असतो साहजिकच सत्याविषयीचे प्रश्न अधिकच गुंतागुंतीचे बनतात आणि मोक्ष अनाकलनीय राहतो म्हणूनच मोक्षाबाबत मोक्ष म्हणजे ज्ञानाचा अंत असेही म्हटले जाते आपल्याकडे सत्य हा शब्द अलीकडे इतक्या उथळ पद्धतीने वापरला जातो की तो जणू काय ज्ञान या प्रक्रियेशी संबंधित आहे असे वाटत राहते याचे कारण पाश्चात्य देशांमध्ये सत्य हा शब्द फारच सोपा करून वापरला जातो ज्ञानतंत्र नेहमी सत्यापाशी पोहोचण्याचा प्रयत्न ...